Published:

आमगांव सालेकसा राज्य महामार्गावर वाघ नदीवर बनलेला पुल धोकादायक?

आमगांव- सालेकसा राज्य मार्गावर वाघ नदीवर बनलेला पुल जर्जर झाल्याने केव्हाही मोठी दुर्घटना होऊ शकते.
सदर मार्ग महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छतीसगड़ या तीन राज्यांना जोडणारा असुन या पूलांवरून दिवस रात्र अवजड वाहनांचे आवागमन सुरू आहे. परंतु अनेक वर्षांपासून सदर पुलाचा स्ट्रकचर ऑडिड करून पुनरनिर्माण करण्याची मागणी होत आहे परंतु
प्रशासन निद्रावस्थेत असल्या सारखे करित आहे.
सदर पुलावरून वाहतूक होत असताना कंपन होत असते.त्यामुळे बांधकाम विभागाने
पुलावर जड वाहतूक करण्यास मनाई असल्याचे फलक लावून सतर्कतेचा इशारा दिला आहे. परंतु तरिही वाहन चालक धोका पत्करून आवागमन करतात त्यामुळे जड वाहतूक सुरूच आहे. या रस्त्याची व पुलाची जड वस्तू वाहुन नेण्याची क्षमता नसुनही बिनधास्त जड वाहने चालतांना दिसुन येतात.
सदर रस्ता आंतरराज्यीय रस्ते मार्ग तीन राज्यांना जोडणारा ३३५, साखळी क्रमांक २३८/२०५ वाघ नदीवर पुल कालबाह्य झाल्याने व क्षतिग्रस्त असल्याने प्रशासनाने या पुला वरील जड वाहतूकीस बंदी घालण्यात आली आहे. व मागील दोन वर्षांपासून जिल्हा प्रशासन ने सतर्कतेचा इशारा देत वाहतूक बंदी केली परंतु तीन राज्यांना जोडणारा वाहतूक मार्ग दुसरा नसल्याने याच मार्गावरून जड वाहतूक सुरू आहे. त्यामूळे कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते करिता प्रशासनाने खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांनी केली.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: आमगांव सालेकसा राज्य महामार्गावर वाघ नदीवर बनलेला पुल धोकादायक?, ID: 29734

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर