????बदली होऊन गेलेल्या चार शिक्षकांच्या बदल्यात शाळेत नवीन चारही शिक्षक रुजू
????आचार संहिता संपल्यानंतर मंजूर पदानुसार कमी असलेला 1 शिक्षक पद भरू गटशिक्षणाधिकार्यांनी दिले आश्वासन
- ????शाळेत रुजू झालेल्या शिक्षकांचे शाळा समिती व गावकऱ्यानी केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत.
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
सालेकसा तालुक्यातील हलबीटोला (पिपरिया) येथील जि.प. हिंदी पूर्व माध्यमिक शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरा अन्यथा 21 मार्च गुरुवार रोजी शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद पाडू असे आव्हान शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग व गावकऱ्याकडून निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले होते. हलबीटोला (पिप.) येथील वर्ग 1ली ते 7वी पर्यंतच्या शाळेत शिक्षकांची एकूण 5 पदे मंजूर असून, 4 शिक्षक कार्यरत होते. मात्र दिनांक 13 मार्च 2024 रोजी जि.प. शिक्षण विभागाने शाळेतील सर्व चारही शिक्षकांची बदली करून फक्त एक शिक्षक शाळेत पाठवले होते. त्यामुळे येथील नागरिक, शाळा व्यवस्थापण समिती, व पालकांमध्ये मोठे रोष निर्माण झाले होते. दरम्यान निवेदन देऊन आंदोलनाची भूमिका घेण्यात आले होते. मात्र सदरची मागणी आज दिनांक 21 मार्च रोजी पूर्ण झाली असून आता या शाळेत बदली होऊन गेलेल्या शिक्षकाच्या बदल्यात नवीन 4 शिक्षक शाळेत रुजू झाले आहेत. त्यामुळे कुलूप ठोको आंदोलन मागे घेण्यात आले आहे. शाळेत मंजूर असलेली सर्व पाचही शिक्षकांची पदे भरा अशी मागणी गावकऱ्यानी रेटून धरले होते मात्र आचारसंहिता संपल्यावर नवीन शैक्षणिक सत्रात मंजूर पदानुसार कमी असलेला एक शिक्षक देऊन पूर्ण पदे भरू असे आश्वासन सालेकसा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विशाल डोंगरे यांनी दिल्याने त्यांच्या शब्दांना मान देऊन कुलूप ठोको आंदोलन मागे घेण्यात आले.