????नामांकित विषयतज्ञ डाक्टराकडून विविध रोंगाची तपासणी व औषधपचार
साखरीटोला/सालेकसा:- (रमेश चुटे) मेडिकल एशोशिएसन आफ इलेक्ट्रोहोमियोपेथी तालुका सालेकसाच्या वतीने सुप्रिम सुपरस्पेशालिटी हास्पिटल गोंदिया व्दारे 29 मार्च शुक्रवारला सालेकसा येथील बस स्टाप परिसरात निशुल्क भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराची वेळ सकाळी 11 वा. पासून दुपारी 4 वाजेपर्यंत असल्यामुळे रुग्णानी यांची दखल घ्यावे. निशुल्क रोग निदान शिबिरात सुप्रिम सुपरस्पेशालिटी हास्पिटल गोंदियाचे संचालक डाँ. पुष्पराज गिरी, डाँ. वज्रा पी. गिरी, डाँ. चंद्रशेखर राणा, डाँ. किसन टकरांनी, डाँ. विवेक हरिनखेडे, डाँ. रंजित खरोले, डाँ. अनिल परियाल, डाँ. श्रीकांत राणा, डाँ. नेहा अग्रवाल, डाँ. आनंद कटरे, डाँ. रितेश कटरे, डाँ. कुणाल बोपचे, डाँ. दीपक हरिनखेडे, डाँ. कार्तिक हिंदुजा, डाँ. आस्था ठाकूर असे विविध रो्गांचे नामांकित विषयतज्ञ डाक्टर उपस्थित राहणार आहेत. शिबिरात नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थीरोग, नाक, कान, घसा, तसेच अन्य रोगाचे विषयतज्ञ व शल्यचिकित्सक डाक्टर उपस्थित राहणार आहेत. रक्तदाब व मधुमेह रोगाची तपासणी औषध वितरण केले जाणार आहे. गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना पुढील उपचारासाठी मोफत माहिती दिली जाईल. ईसीजी तपासणी मोफत होणार आहे. शिबिरात आलेल्या रुग्नाला डाक्टरच्या सल्यानुसार अन्य विशिष्ठ तपासणीची गरज असल्यास अश्या रुग्णाची हास्पिटल मधे मोफत तपासणी केले जाणार आहे. आजारांबाबत तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने सालेकसा येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात डोळ्यांचे विकार, अस्तीरोग, ह्रदयविकार, स्त्रीरोग बालकांच्या विविध आजारांबाबत तपासण्या व उपचार केले जाणार आहेत. तालुक्यातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकानी केले आहे.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: आज सालेकसा येथे निशुल्क रोग निदान शिबिराचे आयोजन, ID: 29782
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: आज सालेकसा येथे निशुल्क रोग निदान शिबिराचे आयोजन, ID: 29782
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]