गोंदियाः- गोंदिया येथे सलग २ ते ३ दिवसापासुन निसर्गाचा समतोल बरोबर नाही. जिल्ह्साठी हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला आहे. उन्हाळा,हिवाळा,पाऊसाळा सारखाच वाटु लागला आहे.आज मानवाने प्रगती केली आहे.माणुस आज हवेत जगतो आहे.९ ते १० एप्रिल रोजी रात्री १० ते १२ वाजेच्या दरम्यान जिल्ह्यात वादळी पावसाने मेघ गर्जना,विजांच्या कडकडाटासह जोरदार तुफानासह हजेरी लावली. हवमान खात्याकडुन वर्तविण्यात आल्यानुसार सलग आज शुध्दा पाऊस सुुरुच आहे.शेतकरी हा प्रत्येक नक्षत्रात दुखीच असतो. आता उन्हाळा असल्यामुळे शेतकरी आपल्या मुला-मुलीचे लग्न ठरवित असतो व आपल्या घरी आपले नातेवाईक- मित्र मडंळी येतील आमच्या मुलांना अर्शिर्वाद देतील म्हणुन आनंदित असुन २ ते ३ महिण्यापासुन तयारी करतात. कार्यक्रमाला अळथळा नाही आला पाहीजे म्हणुन पंडीताकडे जातात व लग्नाची तारीख काढतात पण निसर्गापुढे भविष्य सांगता येवु शकत नाही. मानुस हा निसर्गात जगतो निसर्ग मानसात जगत नाही. आज शेतकरी मुलां-मुलीचे हजारो संख्येने लग्न आहेत.त्या साधन सामुग्रीचे बेहाल झाले आहे.
