डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी… जणू संपूर्ण आमगाव शहर झाले होते भिममय-जयभिममय..
आमगाव:-माणसाला माणूस म्हणून जगता यावे.यासाठी आयुष्यभर लढा देणारे, परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती निमित्त शहर परिसरातील समाज बंधु-भगिनीनी निळ्या रंगाची उधळण करीत संपूर्ण आमगाव शहर निळसर करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली..या मिरवणुकीत उपासक उपासिका व अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते.. पंचशील ध्वज,निळा गमच्छा निळा फेटा ,रथ आकर्षणाचे केंद्र ठरले होते.रैली डॉ बाबासाहेब,माता रमाई, यांच्या वेशभूषेत असलेल्या नी सर्वांनचा लक्ष वेधून घेतले होते.. रस्त्यावरून जय भीम चा जय घोष करत संपूर्ण आमगाव शहर भ्रमण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्याला माल्यार्पण करून महामानवाला वंदन करण्यांत आले..जणु संपूर्ण आमगाव शहरच भीममय-जयभीम मय झाले होते..
