देशात महीलांच्या सन्मानाचा व आरक्षणाचा वाजागाजा होतांना अमाणुष अव्यवहार का?मानवाने माणुसकी ठेवली की नाही हाच प्रश्न? देवरीः- (२०-०४-२०२४)गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत मेहताखेडा अंतर्गत गोठाणपार येथे १९-०४-२०२४ रात्री ८ च्या दरम्यान १२ वर्षीय चिमुकल्या मुलींच अपहरण करुन तिच्यावर अमाणुष अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणारी दुर्देैवी घटना आज रोजी समाेर आल्याने संपुर्ण समाजमन हळहळले आहे.समाजात सामाजिक कार्यात अशा प्रकारच्या घटना होत असतील तर समाजातील मुलीना लग्नाला पाठवायचा का?नाही हे प्रश्न आई-वडीलांना पडत आहे. सुत्रांकडुन प्राप्त माहीतीनुसार मौजा- गोठाणपार येथे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भसबोळन येथील नरेश तितराम यांच्या यांचा मुलगा राकेश उर्फ रॉकी व देवरी तालुक्यातील गोठाणपार येथील कुरुसिंग पडोटी यांची मुलगी हेमलता उर्फ लता यांचे काल १९-०४-२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता लग्न आयोजित केले होते.या लग्नात आलेल्या ६ व्या वर्गात शिकत असलेली पिडीत अल्पवयीन १२ वर्षीय मुलगी आलेली होती.त्याचवेळी अंधाराचा फायदा घेवुन नराधामांनी त्या चिमुकलीचे अपहरण करुन गावाशेजारी असणा-या जंगलात अत्याचार केला.यानंतर तिच्या डोक्यावर जबर मारहाण करुन हत्या केल्याची विदारक घटना समोर आली आहे. घडलेल्या घटना क्रमावरुन ही घटना सामुहिकरीत्या करण्यात आल्याचे प्राथमिक दुुष्ट्या निदर्शनास येत आहे.घटनेचा तपास चिचगड पोलिस करित असुन आता पर्यंत आरोपीचा शोध लागला नाही.आरोपीला अटक करुन आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहीजे अशी मागणी नातेवाईकांनी व जनतेनी केली आहे.