जि.प.सदस्य,पं.स.सदस्य,ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीच्या कामात व्यस्त, लोकप्रतिनिधी म्हणुन काय भुमिका घेणार? गोंदियाः- शिक्षण विभाग (प्राथ.)जिल्हा परीषद गोंदिया येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १२/०४/२०२४ ला पत्र काढुन १८५ जि.प.शाळेतील मुख्याध्यापकांना १ ते २० पटसंख्या असलेल्या शाळांना समायोजन करण्याबाबद कळविले आहे. विविध अधिकारी शाळेला भेट दिली असता शाळेत पटसंख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे .हि बाब अतिशय चिंताजनक असुन आपल्या शाळेचे नजीकच्या मोठ्या शाळेत समायोजन करण्याचे नियोजित आहे. गावातील परिस्थितीचा विचार न करता,गावातील लोकांची आर्थिक परिस्थितीचा विचार न करता,गावातील लोकांना दोन वेळचे अन्न व्यवस्थित भेटत नाही.त्यांचा हाताला काम नाही,सलग ४ ते ५ किलोमिटर चा अंतर असुन वाहनाचे साधन नाही.अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील आई-वडील आपल्या मुलांना शिकवु शकणार नाही ज्या लोकांना मतदान करुन निवडुण देतो ते ग्रामीण भागातील जिवनमान,शिक्षण,रोजगार,यासाठी काम करतात का? हा मोठा प्रश्न सामान्य माणसापुढे आहे.ग्रामीण भागातील महीलांचे म्हणणे आहे शाळा सुरु राहीलीच पाहीजे. लोकप्रतिनिधी काय करतात याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.
