देवरीः- (कन्हैया क्षीरसागर) देवरी तालुक्यातील मौजा पुराडा/कारूटोला येथे नातेसंबंधात लग्न समारंभात गेले असता दुर्दैवी घटना झाली.
प्राप्त माहितीनुसार पिडकेपार ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम टेकाबेदर येथील एका १८ वर्षीय अमित ग्राम कारूटोला पुराडा येथे ता.१४ मे रोजी नातेसंबंधात परिवारासह लग्न समारंभाला आला असताना, लग्न समारंभाचे कार्यक्रम आटोपल्यानंतर, त्याच लग्न समारंभातील चार ते पाच पाहुणे मंडळीसह दुपारी २ ते २.३० वाजे दरम्यान वाघनदीमध्ये आंघोळीला गेला मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे खोलवर असलेल्या ठिकाणी ओढल्या गेला त्यात सदर मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नदीत पाणी जास्त प्रमाणात असल्यामुळे, सदर मुलाचा शव सायंकाळी ७ वाजे दरम्यान फुक्किमेटा व पुराडा येथील पोलीस पाटील यांच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले. मृतक अमित याचे वडील पोलिस विभागात कार्यरत असून त्यांना एक मुलगी आहे. आणि मृतक अमित असे दोन अपत्य होती. दुर्दैवाने सलामे कुटुंबावर आलेल्या आघाताने त्यांच्या स्व – गावी टेकाबेदर येथे
आणि घटनेच्या ठिकाणी कारुटोला/पुराडा येथेही हळहळ व्यक्त होत आहे. सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये मर्म नोंद केला असून, शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविण्यात आले. पुढील तपास पोलिस करीत आहे.
