देवरीः- देवरी तालुक्यातील तहसिल कार्यालयाचे क्षेत्रफळ अंदाजे 40 कि.मी.अंतराचे आहे.ग्रामीण भागातील लोकांना घरकुल,शाळेतील विद्यार्थ्याना शाळेच्या कामासाठी विविध प्रकारचे दाखले लागत आहेत.शाळेचे वर्ष सुरु झाले असुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्कालरशिप,बाहेर गावी शाळा शिकत असणा-या विद्यार्थांना सर्व कागदपत्रे लागत असल्यामुळे तहसिल कार्यालयातील प्रलंबित दाखले लवकर निकाली काढावे. लाडली बहीन चे ऑनलाईन फार्म भरण्यासाठी शासन स्तरावरुन ग्रामपंचायतला भरपुर दबाव येत आहे.पण नव विवाहीत मुलीना इनकम सर्टीफिकेट व राशन कार्ड मध्ये नाव असणे गरजेचे आहे व घरकुल लाभार्थ्यांना कास्ट व डोमासाईल,इनकम सर्टीफिकेट ची आवश्यकता आहे.ते न मिळाल्यामुळे घरकुल लाभार्थ्याचे काम अपुरे आहे. प्रलंबित दाखले तात्काळ पुर्ण करुन द्यावे जेणे करुन लोकांना त्रास होणार नाही. दिलीप जुडा (संरपच ग्रा.पं.ढिवरीनटोला)