आमगांव :- बुद्ध वन कुटी भवभूती नगर व येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा आमगांव (राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर) यांच्या संयुक्त विद्यमाने आमगांव येथे आषाढी गुरू पौर्णीमा निमीत्त भदंत अश्वघोष यांनी दि.21/07/24 पासून वर्षावासाला प्रारंभ केले. बौद्ध परंपरेनुसार आषाढी गुरू पोर्णिमा पासुन वर्षावास व धम्म चक्र पवत्तन दिनाचा महत्व असुन येथे पौर्णिमेच्या दिवशी हा पवित्र सोहळा तालुक्यातील उपासक व उपासीकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन भदंत अश्वघोष व भारतीय बौद्ध महासभा शाखा आमगांव चे अध्यक्ष सुरेन्द्रकुमार खोब्रागडे, महासचिव सुधीर टेंभुर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्म देशना व वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी भदंत अश्वघोष यांनी आषाढी गुरूपौर्णिमा निमीत्त तथागत भगवान गौतम बुद्धाला वंदन करून त्रिशरण पंचशील देऊन उपस्थितांना वर्षावास हा तीन महिणे असतो त्याचे महत्व समजावून सांगीतले.
तद्नंतर भारतीय बौद्ध महासभा शाखा आमगांव चे अध्यक्ष सुरेन्द्रकुमार खोब्रागडे यांनी
वर्षावास चे महत्व व तथागत भगवान गौतम बुद्धानी पंचवर्गीय भिख्खुना प्रथम बुद्ध धम्माची दिक्षा देऊन प्रथम धम्म चक्र पवत्तन केले.त्या दिवसापासून गुरू पौर्णिमेला सुरूवात झाली करिता धम्म उपासक व उपासीकांनी धम्म गुरुंना दान पारमीता अंतर्गत दान देऊन पुण्य कर्म अर्जीत करण्याचे आव्हान केले.
या गुरू पोर्णिमा व वर्षावास कार्यक्रमाला बौद्ध उपासक व उपासीका अतुल कोटांगले तेलीटोला,पुरुषोत्तम कोटांगले खामखुर्रा,जवाहर शहारे आमगांव आदर्श,राजकुमार शामकुवर राजनांदगाव, सिंधू शहारे केरेगाव, मिना राहुलकर रिसामा, रिता शहारे रिसामा,उपाली डहाट मोहगांव, अस्मिता कोटांगले, रजनीकांत कोटांगले तेलीटोला, प्रियंका राऊत,जयश्री शेंडे पोवारीटोला, सुनंदा खोब्रागडे टाकरी,
ॲडव्होकेट रंजीता खोब्रागडे,संगीता टेंभुर्णे,पोर्णिमा गजभीये, रत्नमाला नागवंशी,श्रद्धा शहारे,बिंदू शामकुवर,कल्पना साखरे, अंजली खोब्रागडे, भास्कर गजभीये, अरूण खोब्रागडे, शेखर खोब्रागडे टाकरी उपस्थित होते.