देवरीः- ओबीसी विद्यार्थ्यांच्या हिताकरिता वसतिगृह सुरू करणाऱ्या सहायक संचालकांचे ओबीसी बहुजन विभागाच्या सचिवाने केलेले निलबंन रद्द करावे, शासनाने ७२ वसतिगृहे सुरू करण्याचे दिलेले आश्वासन पाळावे,१०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी,ओबीसी विभागाला स्वतंंत्र जागा व ओबीसी अधिकारी देण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन आज शुक्रवारी (दि.२३) राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्च्याच्या वतीने तहसिलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. जर शासनाने निलंबन रद्द करून राजेंन्द्र भुजाडे यांना सन्मानाने सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग,नागपूर या पदावर पूर्ववत केले नाही तर ओबीसी समाज शांत बसणार नाही.तर महाराष्ट्र भर ओबीसी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येतील अशा इशारा देण्यात आला.निवेदन देतेवेळी कृष्णा ब्राम्हणकर अध्यक्ष ओबीसी सेवा संघ, सुनंदा भुरे, अनुप रहीले, मयुर वालदे,वंदना डोंगरे, रघुराम वाडीभस्मे, प्रज्वल राउत, करुणा नंदागवळी, गेंदलाल वरचो, मयुर वालदे, समरित गुंडी, हेमप्रकाश वाढई, निखिल खोब्रागडे,संदिप तवाडे, , उपस्थित होते.
