🔹संबंधित अधिकाऱ्यांनीं केले जागेची पाहणी
साखरीटोला/सालेकसा-: सुमारे तीन कोटी रुपये निधीतून खर्चून सालेकसा तालुका स्थळी बसस्थानक बांधले जाणार आहे. क्षेत्राचे माजी आमदार संजय पुराम यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले असून बसस्थानकाच्या कामाला गती आली आहे. तात्काळ प्रभावाने 30 आगस्ट रोजी संबंधित अधिकाऱ्यांनीं सालेकसा येथे येऊन जागेची पाहणी केले आहे. सालेकसा हे तालुका स्थळ असून मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमांत स्थळी आहे. प्रवाशी संख्या व बसगाड्यांची संख्या लक्षात घेऊन विधार्थी, विध्यार्थिनी व महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन मुख्यमार्ग व शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बस स्थानकासाठी जागा मिळू शकेल यावर भर दिले जात आहे. महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झालेल्या 3 कोटी रुपयेच्या निधीतून बसस्थानकांचे बांधकाम होणार होणार असून बसस्थानक इमारतीत कॅन्टींग सुविधा, पार्सल सुविधा, विद्यार्थ्यांसाठी पासेस सुविधा, महिला, पुरूष व अपंगांसाठी स्वतंत्र प्रसाधानगृहे आदी सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. माजी आमदार पुराम यांच्या सततच्या प्रयत्नाने बसस्थानकाच्या बांधकामासाठी 3 कोटी रुपये मंजूर झाले. मंजुरी मिळताच आता कामाने सुद्धा वेग पकडला आहे. राज्य शासनाचे निर्देशानुसार सालेकसाचे तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले, यांनी एस. टी. परीवहन विभाग भंडाराचे विभागीय वाहतूक अधिकारी सौ. शितल सिरसाट, परीवहन विभागाचे अधिकारी अल्केश पशीने, विभागीय स्थापत्य अभियंता समीक्षा जावडकर, यांनी 30 आगस्ट रोजी सालेकसा येथे येऊन जागेची पाहणी केले. यावेळी क्षेत्राचे माजी आमदार संजय पुराम, तालुका भाजपचे अध्यक्ष व प.स. सदस्य गुमानसिंह उपराडे, नगरपंचायतचे माजी बांधकाम सभापती उमेदलाल जैतवार, भाजप आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष सरोज परतेती, तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, सालेकसा पत्रकार संघांचे अध्यक्ष मायकल मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता सुनील असाटी, ब्रजभूषण बैस, विक्की भाटिया, राजेश भास्कर, अंकूश गुडय्या, तुरकरजी, बन्सी पंधरे, हर्षल झरणे, महसूल व परीवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जागेचा प्रश्न सुटताच लवकरच बसस्थानक बांधकामाला सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
