ढिवरिनटोलाः- ग्रामपंचायत ढिवरीनटोला येथे दारु बंदी झाली पाहीजे म्हणुन संपुर्ण गावातील महीलांनी ग्रामपंचायत मध्ये येवुन गावातील दारु बंद झालीच पाहीजे यासाठी मिंटीग आयोजित करुन महीलांनी पुढाकार घेतला. गावातील सरपंच दिलीप जुडा इतर ग्रामपंचायत सदस्य व गावातील आय.सी.आऱ.पी उमेद -सुषमा वैद्य यांनी गावात दारु बंद का पाहीजे या बदल बोलतांनी सांगितले महीलांचे पती दारु पिवुन येतात महीलांना त्रास देतात.येणा-या आमच्या मुलांना शुध्दा या समस्या येतील त्यासाठी दारु बंद झालीच पाहीजे यासाठी आम्ही सर्व महीलांनी पुढाकार घेतला आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 271