विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करतांनी विद्यार्थ्यांने मोठे स्वप्न बघावे – नित्यानंद झा अप्पर पोलिस अधिक्षक देवरी

देवरीः- युवा मराठी पत्रकार संघ , हेल्पिंग ग्रुप व वनामी फाउंडेशन संयुक्त विद्यमाने भव्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणे ही बाब नाविन्यपूर्ण व अत्यंत महत्त्वपूर्ण आहे .ग्रामिण भागात विदयार्थ्यांना संकोचित विचार पुढे जावु देत नाही.आपण कुठेे आहोत त्याकडे न बघता आपण आपल्या आयुष्यात मोठे स्वप्न बघुन त्यांना आपल्या जिवनात उतरविणे महत्वाचे आहे.आपली परिस्थिती खराब आहे माझ्याकडे पैसा नाही असे विचार करित बसलो तर आपण मोठे स्वप्न पुर्ण करु शकत नाही.                                   विद्यार्थ्यांनी  गावात किंवा जिल्ह्यात मोठे होण्यात आपले स्वप्न पुर्ण झाले असे समजु नका.आपल्याला देशात व विदेशात आपली प्रतिमा गाजविण्यासाठी काम करावे लागेल त्यासाठी आपल्या स्वप्नाला सतत नजरे समोर ठेवुन सतत अभ्यास करावे लागेल.                                                                                                                                                                                  सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. नित्यानंद जी झा, अप्पर पोलीस अधीक्षक देवरी, अतिथी मान. कविता गायकवाड उपविभागीय अधिकारी देवरी, मान. विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, मान. डांगे साहेब पोलीस निरीक्षक देवरी यांचे विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन यावेळी लाभले.कार्यक्रमाप्रसंगी अतिथी व सत्कारमूर्ती मान. राहुल दुबाले हे पोलीस अधिकारी व पोलीस बंधू आणि त्यांच्या परिवाराच्या समस्या सोडविण्यासाठी सतत करीत असलेल्या कार्याबाबत उत्साह पूर्वक शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन संपादक (लोकतंत्र) मुकेश खरोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.यावेळी स्व. श्रीमती जयश्री पुंडकर विदर्भा अध्यक्ष पोलीस बाईज संघटना यांच्या समाजोभिमुख केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा मरणोपरांत सत्कार करण्यात आला हे सत्कार त्यांचे पती संतोष पुंडकर, उपाध्यक्ष भवभूती रिसर्च ऑकॅडमी यांचे मान. कविता गायकवाड उपविभागीय अधिकारी ,देवरी, मान. विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच समाजसेविका सौ. आरती जांगडे संपर्कप्रमुख महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना देवरी तालुका यांचे याप्रसंगी सत्कार करण्यात आला.                                                                                                                                                                              संघटना वाढीसाठी आता जोमाने प्रयत्न करावे लागेल व आपल्या भागातील पोलीस व पोलीस परिवाराच्या समस्या जाणून घ्या व माझ्याकडे पाठवा शासन दरबारी समस्या निकाली लावण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल असे संघटनेच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले यांनी सांगितले. तसेच देवरी सारख्या लहानशा ठिकाणी होतकरू विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे भव्य आयोजन केल्याचा मला खूप आनंद झाला अशी ही भावना यावेळी व्यक्त केली.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करतांनी विद्यार्थ्यांने मोठे स्वप्न बघावे – नित्यानंद झा अप्पर पोलिस अधिक्षक देवरी, ID: 30228

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर