शासन निर्णयात नेमका कोणत्या निधीतुन मानधन अदा करावयाचा या बदल स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे गटविकास अधिकारी व ग्रामसेवक सभ्रांत गोंदियाः- राज्यातील ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत) येथील केंद्रचालक यांचे मानधन सलग ६ महिण्यापासुन मिळाले नाही.शासनाने २६ जुन २०२४ रोजीच्या पत्रान्वये महाआयटी कंपनी ची नियुक्ती झाली त्यानंतर काहीकारणास्तव महाआयटी कंपनी ने ०१ जुलै २०२४ ला नकार दिला.१९ ऑगष्ट २०२४ रोजीच्या बैठकितील निर्णयाने रेलटेल कॉर्पोरेशन इंडीया लिमिटेड वआई टी आई लिमिटेड या केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम निवड या विभागाच्या दि.१९ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली. दि.१०.१०.२०२४ रोजी मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मिळालेल्या मान्यतेनुसार राज्यात ग्रामीण भागातील जनतेला ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणा-या विविध सेवा /दाखले देण्याचे काम व सर्व लेखे ऑनलाईन करण्याचे काम संगणक परिचालक करतात.ग्रामपंचायत स्तरावरुन संगणक परिचालक यांचे प्रति माह प्रत्येकी रु. १००००/- मानधन अदा करावे व नेमणुक करण्याची कार्यपध्दती व इतर संबंधित बाबी ग्रामरोजगार सेवकांप्रमाणे लागु राहतील. ग्रामपंचायत स्तरावरुन संगणक परिचालकांचे मानधन अदा करावे असे शासन निर्णय असले तरी नेमक्या कोणत्या निधीतुन देण्यात यावे असे स्पष्ट नसल्यामुळे संगणक परिचालकांना ग्रामसेवक/संरपच मानधन देतील का? असा प्रश्न संगणक परिचालकांना पडला आहे.सलग ६ महिण्यापासुन विना मानधनाने आपले जिवन जगत आहेत.संगणक परिचालक यांचे जिवन नैराश्यमय झालेले आहे.संगणक परिचालकांना दिवाळीला मानधन मिळणार कि नाही यांची चिंता संगणक परिचालकांना लागली आहे.शासन निर्णयात शासनाने नेमक्या कोणत्या निधीतुन मानधन करावे असे शुध्दीपत्रक काढुन संगणक परिचालकांना न्याय द्यावा अशी मागणी संगणक परिचालक संघटनेनी केली आहे.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: ग्रामपंचायत संगणक परिचालक यांना ग्रामपंचायत मधुन मानधन अदा करण्याचे शासन निर्णय निर्गमित, ID: 30266
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: ग्रामपंचायत संगणक परिचालक यांना ग्रामपंचायत मधुन मानधन अदा करण्याचे शासन निर्णय निर्गमित, ID: 30266
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]