देवरीः- माहीतीच्या सुत्रानुसार एन.एच.53 मुंबई-कोलकत्ता हायवे आंतरराज्यीय सिमा तपासणी नाका सिरपुरबांध येथे तयार कऱण्यात आला.सिमा तपासणी नाका हा डिजीटल स्वरुपात तयार कऱण्यात आला.सिमा तपासणी नाक्यावर ओव्हरलोड ट्रक जावु नये त्यासाठी धर्मकांट्याची व्यवस्था केली आहे.तेथे गा़डी अंडरलोड झाल्यावर सिमा तपासणी निरिक्षक अधिका-याजवळ येतात.त्याठिकाणी त्या गाड्या मध्ये काय आहे व कागदपत्रे व्यवस्थित आहेेत का यांची तपासणी होण्याची गरज आहे पण त्याठिकाणी कोणत्याही गाडीचे कागदपत्रे पाहीले जात नाही.त्याठिकाणी अधिकारी वेगळेच असतात त्याठिकाणी प्राईव्हेट मानसाच्या माध्यमातुन पैसे लुटले जातात.अधिकारी हे कोणतीच गाडी तपास करित नाही.त्या मानसाकडे सांविधानिक शासनाचे कोणतेच प्रमाणपत्र नसुन खुलेआम लुट करण्याचे काम करतात.एवढे मोठे प्रकरण खुलेआम होत आहे यामध्ये प्रशासन व शासनाचे डोळे झाकले आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे.
