देवरीः- महाराष्ट्र राज्यात २०२४ निवडणुका होत आहेत.महाराष्ट्रातील प्रास्थापिक पक्ष हे लोकांच्या समस्या बाबद कोणतेही व्यकत्य करित नाही.आज शेतकरी लोकांचे उत्पन्नाच्या प्रमाणात त्यांना भाव देत नाही.शेतकरी जो उत्पन काढतो त्या वस्तुचे भाव वाढत नाही.जे कारखाण्यातुन येते त्यांचे भाव दुपट्टीने वाढत आहेत.आज खाताचे भाव आकाशाला भिडले आहेत.शेतकरी आत्महत्या करित आहे.यावर सरकार काही उपाययोजना करण्याचे शब्द मतदारांना देत नाही. महिलांना महायुती सरकारने १५०० रुपये देण्याचे घोषणा करुन महिण्याच्या अगोदर त्याच्या खात्यात जमा केले.तरी आता निवडणुकीच्या जाहीरनाम्यात २१०० रुपये देण्याचे घोषणा केली आहे.महीलांना फुक्कटात पैसे देवुन सरकार काय साध्य करित आहे.हे महिलांना जाणुन घेतले पाहीजे.त्याच्या विरुद्ध महाविकास आघाडी म्हणतो आहे की आम्ही ३००० रुपये देवु म्हणजे नेमके महाराष्ट्रात चालले का?महीलांन वर सरकार एवढी महेरबान का? लाडली बहीणीला २१०० रुपये किंवा ३००० रुपये दिले की त्यांच्या संसाराचा संपुर्ण उदरनिर्वाह होणार आहे.त्यांचा मुलांना शिक्षण मिळाले नाही तरी चालेल त्याच्या मुलांना नौकरी नाही मिळाली तरी चालेल अशी अवस्था आजच्या निवडणुक दरम्यान बाजेपी व कॉग्रेस करित आहे. शिवाजी महाराज्याच्या साम्राज्याला कलंकित करणारे राजकारण महाराष्ट्रात वर्तमानात सुरु आहे.ज्या महिलांना सांविधानिक सन्मान पाहीजे तो न मिळता पैसा ने खरेदी करुन आपले राजकारण मजबुत करण्याचे षढयत्र महाराष्ट्रात होत आहे.
