गोंदियाः- महाराष्ट्रातील २०२४ ला विधानसभा निवडणुक होत आहेत.त्यामध्ये मतदार लोकांना धर्म वाचविण्यासाठी मतदान करा म्हणुन सांगितले जाते.धर्म हा आपण जिवन जगत असतांनी आपले जिवन व्यवस्थित जगावे यासाठी माणुस वापरु शकतो. विधानसभा ही निवडणुक ही धर्मासाठी नसुन ही संपुर्ण मानसाच्या सांविधानिक अधिकारात शिक्षण,रोजगार,नौकरी,व्यापार,शेतकरी यांच्या पिकाला हमीभाव देण्यासाठी आहे.आमच्या ग्रामीण भागातील लोकांना साविधानिक अधिकाराची जाणिव नसल्यामुळे जे उमेद्वार विधानसभा निवडणुकीमध्ये उभे होतात ते मोठ्या लोकांकडुन पैसे घेवुन आमच्या लोकांना वाटुन मत मागतात नंतर आमचे लोग ५ वर्ष बोंबा मारतात आमदारने काही केलं नाही.त्यासाठी मतदार यांनी समजुन मतदान केलं पाहीजे. ओबीसी लोकांना काग्रेस व बीजेपी ने आता पर्यंत सांविधानिक अधिकारापासुन वंचित ठेवले आहे.तरी आमचे ओबीसी लोग काग्रेस व बीजेपीच्या नांदात फसुन आपल्या मुलांचे भविष्य खराब करित आहे.आज ओबीसी वर्ग हा गावखेड्यात ७५ टक्के राहतो तेथील जि.प.शाळा बंद झाल्यावर काय ओबीसी मुलांना शिकवु शकणार का? यांचा ओबीसी ने करावा.
