आमगांवः- सर्व महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणुक २०२४ येत्या २० तारखेला मतदान होत आहे.त्यामध्ये मतदारांना व्यवस्थित रित्या मतदान करता यावा यासाठी बुथ मध्ये स्टिकर,बोर्ड,राहण्याची व्यवस्था,आरोग्याची व्यवस्था,सर्व सोयी बुथ वर राहणार आहेत.मतदारांनी कोणत्याही पक्षाचा स्टिकर नेवु नये.मतदान केंद्रावर मोबाईल नेता येणार नाही. 66-आमगाव विधानसभा मतदारसंघाकरीता 07199-295296 असे नंबर आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आरोग्य विभागामार्फत प्राथमिक उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्रा व्यतिरिक्त आधारकार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, निवृत्तीवेतनाचे दस्तावेज, वाहन चालक परवाना, मनरेगा रोजगार ओळखपत्र, दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही स्मार्ट कार्ड, कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, बँक किंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले पासबुक. शासन, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वितरीत केलेले छायाचित्रासह ओळखपत्र. संसद, विधानसभा, विधानपरिषद सदस्यांसाठीचे ओळखपत्र इत्यादी 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार आहे. आमगांव विधानसभात 311 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर आज त्या-त्या विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मतदान पथक (पोलिंग पार्टी) रवाना करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदार व 85 वर्षावरील मतदारांसाठी मतदान केंद्रावर आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून व्हीलचेअरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
