देवरीः- निवडणुक प्रवाहात प्रत्येक मतदार कुणाचा मित्र कुणाचा नातेवाईक,कुणी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असतो.विधानसभा मतदार संघात किती ही उमेदवार असले तरी निवड मात्र एकाची होते.त्या एकाला सर्वांचे काम करावे लागते.गावातील मित्रमंडळीना रागावुन किंवा भांडण करुन काही मिळत नाही.आपल्याला आपले काम करणे आहे.मित्रानो राजकारण एक कला आहे ज्या व्यक्तीला त्याचे कौशल्य जमले तो लोकांच्या मनावर अधिराज्य करतो.आपण राजकारणाचे दर्शक आहोत पाहुन चर्चा करु शकतो पण आपण त्याला समजु शकत नाही. म्हणुन गावा-गावात माणसा सोबत वैर करुन गावाचा सत्यानास करु नका.गावाला वैज्ञानिक दृष्टीकोनाने व्यापक बनवा,विद्यार्थ्याना शिक्षण देवुन त्य़ांना त्यांचे जिवन अमुल्य बनवा,विद्यार्थ्याना व्यसनापासुन दुर ठेवा,विद्यार्थ्याना सांविधानिक अधिकारांची जाणिव झाली पाहीजे यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम लावुन त्यांचे जिवन ज्ञानात्मक बनवा भांडण करुन कुणाचा ही फायदा नाही म्हणुन पक्ष विसरुन सर्वानी गुण्यागोंविदाना नांदा.
