🔷कबड्डी स्पर्धेत जय माँ काली क्रीडा संघ बनगाव प्रथम, तर आदर्श क्रीडा संघ दत्तोरा दृतीय
🔷स्पर्धेत गोंदिया, आमगाव, सालेकसा, तालुक्यातील अनेक कबड्डी संघांचा सहभाग
साखरीटोला/ सालेकसा-:
हल्लीचे युग हे धावपळीचे आहे करमणुकीसाठी इलेक्ट्रॉनीक साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेकजण मैदानावर खेळनेच विसरले आहेत. खेळाडू वृत्ती, सांघिक वृत्ती, सहकार्य वृत्ती, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्वास या सुप्त गुणांचा विकास व उत्तम आरोग्यासाठी मैदानी खेळ जोपासण्याची गरज आहे असे उदगार तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे यांनी राजे क्रीडा मंडळ कन्हारटोला व्दारे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच सौ.मंगलाताई कोरे यांनी राजे क्रीडा मंडळाच्या युवकांनी दरवर्षीनुसार या वर्षी सुद्धा कबड्डी स्पर्धा आयोजित करून कब्बड्डी खेळाडूंना प्रोत्साहित करून गावाचा मान वाढविला असे मत व्यक्त केले. राजे क्रीडा मंडळ कन्हारटोला (पानगाव) च्या वतीने आयोजित तीनदिवसीय कबड्डी स्पर्धेत 12 जानेवारी रोजी अटीतटीच्या अंतिम सामन्यात आमगाव तालुक्यातील बनगाव येथील जय माँ काली संघाने प्रथम क्रमांक तर गोंदिया तालुक्यातील आदर्श क्रीडा संघ, दत्तोरा या संघाने दृतीय क्रमांक पटकावला़ आहे, तिसरा क्रमांक राष्ट्रगाण क्रीडा संघ भालीटोला व चौथ्या क्रमांकाचा मान राजे क्रीडा संघ कान्हारटोला यांना मिळाला. स्पर्धेत गोंदिया, आमगाव, सालेकसा तालुक्यातील 28 संघांनी सहभाग नोंदवला होता़ विजेत्या संघांना पानगाव (रामपूर) ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. मंगलाताई कोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे पुरस्कार वितरक सालेकसा तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेशजी चुटे यांच्या हस्ते रोख बक्षिस व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले़. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवा सह. संस्थेचे छगनजी बहेकार, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मुकेश भांडारकर, वन समितीचे अध्यक्ष योगेश बहेकार, भाजप नेते प्रेमभाऊ कोरे, प्रा. मनोज हेमने, शालिक कोरे, देवराम कोरे, रघुनाथ रहिले, काशिनाथ बहेकार, बुधराम रहिले, संतोष रहिले, अस्विन रहिले, विठ्ठल मेंढे, जीवन रहिले, बाबू रहिले तेजराम भंडारकर, आत्माराम कोरे, छगन रहिले, छगन ब्राम्हणकर, डाँ. संजय पटले, धनराज चून्ने, अनिल रहिले, विजय राणे, विनोद भांडारकर, कृष्णा गावड, किशोर देवरे, राहुल कुंजाम, तुलाराम धानगुणे उपस्थित होते. स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मुकेश भांडारकर, चंद्रशेखर रहिले, राहुल रहिले, राहुल ब्राह्मणकर, खुशाल कोरे, अरुण ब्राह्मणकर, गणेश नाईक, दीपक रहिले, ढालेश नाईक, कार्तिक बहेकार, प्रशांत रहिले, मनोज मेंढे, गोपाल नाईक, राजेश कोरे, हिवराज हत्तीमारे, अनिल रहिले, लखन भंडारकर, इंद्रराज मसराम, निलेश रहिले, भाष्कर ब्राम्हणकर, प्रणय रहिले, राजेश हटीले, संदीप डोये, प्रणय भांडारकर, भारत परतेती, उमेश चून्ने, सागर भांडारकर, रोहित चून्ने, प्रेम रहिले, सतीश भांडारकर, देवा रहिले, भोजू कोरे, शुभम रहिले, राहुल लोणारे, भोजराज भांडारकर, गणेश लोणारे, घनश्याम बहेकार, आशिष चून्ने, किशोर भांडारकर, विशाल रहिले शैलेश गायधने, योगराज रहिले यांनी परिश्रम घेतले.