🔷रेखा फुंडे, वीणा कटरे सभापती पदाचे प्रबळ दावेदार तर उपसभापती जितेंद्र बल्हारे यांच्या नावाची चर्चा
🔷सभापती पदाची आरक्षण सोडत सर्वसाधारण महिला होणार सभापती
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे) ग्रामविकास विभागाकडील अधिसुचना दिनांक 04/10/2024 नुसार गोंदिया जिल्ह्यातील सर्व 8 पंचायत समितींच्या सभापती पदांचे आरक्षण शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी निश्चित करण्यात आले असून आरक्षण सोडतीत सालेकसा पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने सालेकसा पंचायत समितीत महिला राज स्थापित होणार आहे. 10 जानेवारी रोजी गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत सभेचे आयोजन करण्यात आले होते. 8 सदस्यी सालेकसा पंचायत समिती मध्ये कांग्रेस पक्षाचे 6 तर भाजपचे 2 सदस्य आहेत. कांग्रेसच्या महिला पस सदस्या मध्ये सौ. रेखाताई फुंडे, सौ. वीणाताई कटरे, सौ.सुनीताताई राऊत, वर्तमान सभापती प्रमिलाताई गणवीर अश्या 4 महिलांचा समावेश आहे. यात सौ. रेखाताई फुंडे, आणि सौ. वीणाताई कटरे सभापती पदाचे प्रबळ दावेदार असल्याचे सांगण्यात येते. सालेकसा पंचायत समिती मध्ये कांग्रेसचे बहुमत असून सभापती पदासाठी तळजोळ करणे सुरु झाले आहे. तर उपसभापती पदाची माळ पस सदस्य जितेंद्र बल्हारे यांच्या गळयात पडू सकते अशी चर्चा आहे.
