साखरीटोला/सालेकसा -: शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 99 वी जयंती 23 जानेवारी रोजी सालेकसा येथील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात मोठया थाटामाटात साजरी करण्यात आले. भारताच्या इतिहासात अनेक प्रसिद्ध समाजसेवी रत्ने जन्माला आली. याच क्रमाने महाराष्ट्राला अभिमानास्पद करणारे शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एक चमकणारे रत्न होते. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आजही देशभरातील राजकारणात आदराने घेतले जाते. असे मत शिवसेनेचे जिल्हा समन्व्यक हिरालाल साठवणे यांनी व्यक्त केले. ते केवळ नावाने नव्हे तर कृतीने हिंदूहृदय सम्राट होते. त्यामुळे त्यांची कीर्ती भारतात आणि भारताबाहेरही होती. त्यांचा जन्म एका सामान्य पण महाराष्ट्रीय कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढा दिला. महाराष्ट्रातील मराठी भाषिकांना संघटित करण्यासाठी त्यांनी संयुक्त मराठी चळवळीत मध्ये प्रमुख भूमिका बजावली. असे मत युवा सेनाचे तालुका प्रमुख मायकल मेश्राम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची अध्यक्षता जिल्हा समन्व्यक डॉ. हिरालाल साठवणे यांनी केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना तालुका सलाहाकर प्रमुख संदीप दुबे, तालुका प्रमुख विजय नागपुरे, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षीताई फुंडे, गुड्डू थेर, युवा सेना तालुका प्रमुख मायकल मेश्राम, सलीम शेख तालुका प्रमुख अल्पसंख्यांक, मनीष असाटी शहर प्रमुख, नंदकिशोर तिडके, शहर युवा सेना प्रमुख बाजीराव तरोने, किशन रहांगडाले, ओमकार बसेना, कमल नागपुरे, विकास नागपुरे, संतोष लील्हारे, विनोद वैध व शिवसैनिक उपस्थित होते.
