देवरी आमगांव विधानसभेत काॅग्रेस पक्षाला मोठा धक्का देवरीः- दि.21-02-2025) देवरी येथे काल शिवसेना शिंदेगटात आमगाव विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार सहेषराम कोरोटे यांच्यासह विविध संरपच व कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश शिवसेना शिंदे गटात झाला.सर्वात जास्त पदाधिकारी हे काॅग्रेस पक्षाचे होते.यामध्ये आमगाव-देवरी विधानसभेमध्ये काॅग्रेस पक्षाला मोठा धोका निर्माण झाला आहे.काग्रेस च्या संघटनेत मोठा फेरबदल होण्याचे चित्र दिसत आहेत.ह्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी शिवाजी महाराजाच्या स्वराज्य यावे यासाठी आम्ही सामान्य लोकांना सोन्याचे दिवस यावे यासाठी सतत काम करित आहोत.आम्ही महाविकास आघाडीतुन निघुन कोणता गुन्हा केला.आम्ही सामान्य लोकांचे चांगले करु व माझ्या लाडकी बहीणीचे पैसे कधापिही बंद होणार नाही यांची ग्वाही देतो.आमच्या महायुतीला निवडणुन दिल्याबदल मी संपुर्ण महाराष्ट्राच्या जनतेला धन्यवाद देतो. पक्ष प्रवेश कार्यक्रमाला एकनाथराव शिंदे साहेब( उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन) संजय राठोड-महात्मा गांधी रोजगार मंत्री,नरेंद्र भोंडकर- आमदार (भंडारा) व विविध मान्यवर उपस्थित होते.
