सिरपुरबांधः- सिरपुरबांध येथे उन्हाळी हंगाम दरवर्षी 200 ते 300 हेक्कटर ला लावला जातो.सिरपुरबांध येथे धरण आहे त्यामुळे सिरपुरबांध येथील शेतकरी दरवर्षी धान पिक घेतो.शेतकरी बांधवाच्या धान पिकाला पाणी नसल्यामुळे हातात आलेली फसल मरण्याच्या वाटेवर आली आहे.त्यांची फसल वाचविण्यासाठी पाटबंधारे विभागाने संबधित अधिकारी किंवा मंत्री यांच्याशी चर्चा करुन सिरपुरबांध येथील शेतकरी बांधवासाठी पाणि सोडुन द्यावे. ज्याची परवानगी राहत नाही त्यांना लाखो लिटर पाणि दिल्या जाते. शासन म्हणतो की शेतकरी यांचे उत्पन्न दोन पट वाढविणार हे म्हण्यासाठी शासनाला पैसे लागत नाही पण जो शेतकरी कर्ज करुन आपल्या शेतात पिक लावतो पिक लावल्यावर त्याला पाणि नसेल तर त्याचा लाखो रुपये नुकशान झाल्यावर त्यांच्या दुप्पट कसा होणार यासाठी प्रत्यक्षात गावात येवुन मार्गदर्शन करावे आमच्या पिकाला पाणि पाहीजे. जर सिरपुरबांध येथील पाणि शेतक-यांच्या पिकासाठी सोडले नाही तर आम्ही आपल्या पिकासोबत शासनाच्या विरोधात आंदोलनाची भुमिका घेणार अशी शेतकरी यांची मागणी आहे.
