सिरपुरबांधः- ग्रामपंचायत सिरपुरबांध येथिल मौजा मकरधोकडा,चंदिटोला,पदमपुर येथे जल जिवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाक्या बनलेल्या आहेत.पाणि टाक्या बनवुन प्रत्येकाच्या घरी नळ लावुन लोकांना फक्त समाधान होत आहे.पण त्यांना पाणि भेटत नाही.जल जिवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी बनवुन नळ लावुन दिेले पण पाणिच नसेल तर लोकांना जगता येईल का?हाच मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
तिन्ही गावात बोरवेल खोदकाम करण्यात आले पण पाणि कोठे ही लागलेला नाही.त्यामुळे ग्रामिण भागातील आदीवासी क्षेत्र असुन त्यांना शुध्द पाण्याची गरज आहे.तरी आपल्या स्तरावरुन तिन्ही गावांना पाण्याची सोय करुन देण्यात यावी अशी गावक-यांची हाक आहे. जल जिवन मिशन विभाग देवरी च्या इंजिनियर अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली असता इस्टीमेट पुर्नस्थापन करण्यासाठी मंत्रालयात पाठवावा लागेल मग शासन मंजुर देईल तेव्हा पाण्याची सोय होईल असे त्यांनी सांगितले आहे.
