देवरीः- देवरी तालुक्यात दरदिवशी सायं ४ वाजेच्या दरम्यान वारा,विजाचा चमकता तारा,बेधुंद वारा जणु शेतकरी बांधवाच्या धानाला आकाशात पाळणा झुलवायला नेतो की काय अशी अवस्था देवरी तालुक्यात झाली आहे.शेतकरी बांधवाचे धानपिक हे कापणी साठी आलेले आहे.कित्येक शेतकरी बांधवानी पिक कापणी केलेली आहे.त्या पिकावर आज पाऊस पडत आहे. शेतकरी हा कुणावर भरोसा करेल देवावर कि सरकार वर सरकार आश्वासन देतो पण तेही भुकेपेक्षा कमीच असते.त्यामुळे शेतकरी शुध्दा पाहीजे त्याप्रमाणात सरकार वर अपेक्षा ठेवत नाही.सरकारने शेती ला लागलेल्या आर्थिक गोष्टीचा अभ्यास करुन शेतकरी बांधवाना आर्थिक सहाय्य करावे अशी शेतकरी बांधवाची मागणी आहे.

Author: Elgar Live News
Post Views: 206