देवरीः- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर जल हर घर नल लावण्याची घोषणा केली कामांना सुरुवात झाली पक्षाच्या कार्यकत्यांना कामे मिळाली पंतप्रधानाचे कार्यकते खुश झाले.गाव खेड्यात कामे सुरु झाली गावातील लोक मोठे आनंदित झाले की आम्हाला पाणि मिळेल पण त्याचे परिणाम उलटेच झाले आहेत. देवरी तालुक्यात 55 ग्रामपंचायत मधील 10 ते 20 ग्रामपंचायत ला तुरळक ठिकाणी पाण्याचे पाणि मिळत आहे.पण वास्तव बाकी गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही.नरेंद्र मोदी आपण टिव्ही शो करुन लोकांना भ्रमीत करु नका आपण वास्तव गावाकडे पाहुन बघावे गावातील लोकांना शुध्द पाण्याची सोय झाली पाहीजे.कित्येक लोकांना प्रश्न विचारले असता केंद्र शासनाने गावातील नळ योजनेसाठी शासनाने पैसे दिले नाहीत त्यामुळे पाण्याची सोय होवु शकत नाही.




