गोंदियाः- शेतकरी बांधवाना आपल्या शेतात कोणत्याही प्रकारचे पिक लावले की महाराष्ट्र शासनाने ई-पिक नावाचे App विकसित केले आहे.त्यामध्ये शासन धान पिकाच्या कालावधी मध्ये ती ई-पिक प्रणाली सुरु करते त्यामध्ये शेतकरी एवढा प्रगत नाही की तंत्रज्ञानाचा त्याला पुरेपुर माहीती नाही.त्यासाठी कित्येक शेतकरी ई-पिक करण्यापासुन राहुन जातात.कित्येक गावात इंटरनेट सुविधा नाही.कित्येक शेतकरी बांधवाकडे तसे मोबाईल नाहीत. ई-पिक प्रणाली मध्ये उन्हाळी पिकाची माहीती भरतांनी संपुर्ण माहीती भरुन झाल्यावर शेतकरी एकुण श्रेत्राफळापैकी त्यांने किती लागवड केली यांची माहीती त्याठिकाणी येत नसल्यामुळे भरपुर शेतकरी बांधवाचे ई-पिक झालेले नाही.शासनाने त्यांच्या पिकांचे नुकशान करु नये त्यांच्या पिकांची विक्री ही शासकीय केंद्रात झाली पाहीजे यासाठी तात्काळ उपाययोजना करावी अशी शेतक-याची मागणी आहे.




