जि.प.शासकीय कर्मचारी पतसंस्था बचाव कृती समिती ने नियमबाहय भरती प्रक्रीया थांबविणे व नियमबाहय पवनी शाखा निर्मितीच्या विरोधात विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपुर यांना दिले निवेदन (दि.06) भंडाराः- जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्था भंडारा येथे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ने भंडारा येथे सभासदांच्या भावनांना तिलांजली देत मनमर्जीने संस्था चालवित असल्याने जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्थाची सभा मंगलमुर्ती सभागृहात पार पडली होती.या सभेत विषय क्रमांक १५ अंतर्गत संस्था कर्मचा-यांच्या मंजुरी आकृतीबंधानुसार कर्मचारी संख्या निर्धारित करुन कार्यवाही करणे हा ठेवण्यात आला होता.यात सभाध्यक्षांनी विषय क्रमांक १३ नुसार फक्त ४० कर्मचा-यांचा आकृतीबंध मंजुर झाल्याचा सांगितले सोबतच २१ जुलै २०१९ मोरगाव अर्जुनी येथे संपन्न झालेल्या आमसभेत मोघम स्वरुपाचा कर्मचारी निर्धारण स्पष्ट नसलेला विषय आणुन चुकीच्या पध्दतीने ६ कर्मचारी भरती प्रक्रीया राबविल्याचे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष यांनी सभागृहाला सांगितले.सोबतच सदर भरती प्रक्रीया रद्द करण्याबाबत योग्य कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले व अचानक ३१ मे २०२५ रोजी संस्थेने कर्मचारी भरती संदर्भातील जाहीरात प्रकाशित केली यात एक वरिष्ठ लिपिक व दोन कनिष्ठ लिपिक यांची कर्मचारी भरती प्रक्रीया संस्था राबवीत आहे.हा विषय कोणत्याच सर्वसाधारण आमसभेत मंजुरी नसतांनी भरती प्रक्रीया झाली कशी ही नियमबाहय असुन ही भरती थांबविण्यात यावी. पवनी येथील आमसभेने नाममंजुर केलेला व स्वतःसभाध्यक्ष यांनी विशेष सुची मधुन ठराव रद्द केल्यानंतर सुध्दा दिनांक १० मे २०२५ रोजी पवनी येथे शाखा निर्मितीचा उदघाटन सोहळा पार पडत आमसभेचा अपमान केला आहे यामुळे संस्थेमधील ७ हजार सभासद बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.तरी सदर निर्णयाविरोधात संचालक मंडळावर कार्यवाही करुन पवनी शाखा निर्मितीचा निर्णय मागे घेण्यासाठी संस्थेला आदेशीत करावे असे निवेदन देण्यात आले.




