Published:

प्रहार संघटनेने सरकारच्या विरोधात नॅशनल हायवे भर्रेगाव येथे चक्का जाम

देवरीः- महाराष्ट्रात शेतकरी लोकांना एवढा त्रास का?  शेतक-याच्या प्रश्नाना घेवुन लढणा-या नेत्यांना सरकार आश्वासनाच्या अश्वासन देवुन वेळ काढण्याचे कामे करतील असेल तर कार्यकर्त्यांनी काय करावे हे प्रश्न त्यांच्या समोर आहेत.भारताला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्ष झाले.भारतात काॅग्रेस पक्षानी ५५ वर्ष राज्य केलं त्यांनी सुध्दा शेतकरी हितार्थ स्वामीनाथन लागु केला नाही.शेतकरी बांधवाना हमीभाव मिळाला नाही.त्या नंतर बीजेपी चे ओबीसी  नेते नरेंंद्र मोदी पंतप्रधान हे 2014 आधी भाषणामध्ये शेतकरी लोकांचे कर्ज माफ करण्याचे आमिष दाखवले,काॅग्रेस ने जे कायदे पु्र्ण केले नाही ते पुर्ण करण्याचे आश्वासन दिले व शेतकरी लोकांचे वोट घेतले.पण 10 वर्ष लोटल्यावर शुध्दा शेतकरी लोकांना काहीच भेटले नाही.                                                                     महाराष्ट्रात महायुतीची सरकार आल्या बरोबर  शेतकरी लोकांचा  सातबारा कोरा होणार होता.शेतकरी बांधवाना त्यांच्या मालाला हमी भाव मिळणार होता.शेतकरी लखपती होणार होता.पण सरकार निवडणुक लढवितांनी शेतकरी लोकांना एवढे मुर्ख बनविण्याचे काम करते.शेतकरी एवढे साधे की त्यांच्या बोलण्यावर त्यांना सरकार मध्ये बसविते.                                                             प्रहार संघटनेने सरकार ने त्यांच्या मागण्या पुर्ण न केल्यामुळे त्यांना चक्का जाम चा निर्णय घ्यावा लागला.प्रहार संघटनेच्या पदाधिकारी यांनी म्हटले  शेतकरी बांधवानी संघटित होवुन आपल्या हक्काच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावेे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: प्रहार संघटनेने सरकारच्या विरोधात नॅशनल हायवे भर्रेगाव येथे चक्का जाम, ID: 30640

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर