देवरीः- आमगाव विधानसभा क्षेत्रातील आदीवासी सोसायटी व फेडरेशन मध्ये लाखो टन धान विक्री शेतकरी यांनी केली आहे.सलग धान विक्री 2 ते 3 महिण्याचा कालावधी झालेला आहे.आपला देश जय जवान जय किसान हा घोषणा करण्यापुरताच अशी स्थिती आज संपुर्ण भारतात झालेली आहे.महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात लाखो टन धान खरेदी केली जाते पण पैसे मात्र चार ते पाच महिण्याच्या नंतर मात्र लोकप्रतिनिधी गप्प एवढी निराशा लोकप्रतिनिधी ना का? शेतकरी वर्गाना वाटत होता की आमगाव क्षेत्राचे आमदार संजय पुराम हे विधानसभेत बोलुन शेतकरी बांधवाना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवुन देतील पण तसे काही दिसले नाही.शेतकरी लोकांचा थट्टा सरकार कधी पर्यंत करणार असा सवाल शेतकरी लोकांचा आहे.शेतकरी लोकांना उधारी खात,औषधी,डीजेल,मजदुर मिळत नाही.यावर आमदार यांनी विचार मंथन करुन शेतकरी लोकांना पैसे मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी शेतकरी बांधवाची आहे.




