देवरीः- देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत सुरतोली येथील शेतकरी बांधवाना सरकारने सांगितले की शेतक-यांची आर्थिक बाजु मजबुत करुन शेती सोबत जोड धंदा करावा म्हणुन महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत गाईचा गोटा व सिंचन विहीर बांधकाम करण्यासाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये जाहीरात काढुन व शासनाचे अधिकारी यांना माहीती देवुन शेतक-यांनी योजनेचा फायदा घ्यावा.यासाठी ग्रामसभेत सविस्तर माहीती देण्यात आली.शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी तयार झाले. शेतक-यांनी व्याजाने पैसे घेवुन आपल्या गोट्याचे व सिंचन विहीरीचे काम तीन ते चार वर्षापासुन पुर्ण केले.आजतागायत शासनाने त्यांच्या खात्यात अकुशल व कुशल निधीचे पैसे आता पर्यंत न दिल्यामुळे त्यांचा व्याजाचा पैसा योजनेच्या पैसा पेक्षा जास्त झालेला आहे.शेतकरी एवढा सदन नाही की तीन ते चार वर्ष वाट पाहु शकेल.शासनाने वैयक्तिक लाभाचे पैसे तात्काळ देण्यासाठी आमदार संजय पुराम यांना निवेदन दिले.




