देवरीः- देवरी येथील आधार केंद्र हे महिलांचे आधार कार्ड ला मोबाईल नंबर नसल्यामुळे लाडक्या बहिणी ची केवायसी होत नाही.लाडक्या बहिणी आमचे पैसे आम्हाला मिळणार नाही ह्या भितीने आधारला मोबाईल नंबर अॅड करण्यासाठी तालुक्याची भटकंती करावी लागत आहे.लाडक्या बहिणीना कमीत कमी चार ते पाच दिवस तालुक्याची भंटकती करावी लागत आहे. शासनाने अॅप मध्ये बदल करुन मंत्रा डिवाईस ने अपडेट करण्याची सुविधा दिली पाहीजे ग्रामीण भागात कित्येक महीलाचे पती सोबत पटत नाही.त्या लाडक्या बहिणीने काय करावे हे प्रश्न चिन्ह त्यांच्या पुढे आहे.शासनाने योजना द्यायची आहे तर फक्त लाडक्या बहीनीचीच केवायसी करणे आवश्यक आहे. अॅप व्यवस्थित चालत नसल्यामुळे लाडक्या बहिनीना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.शासनाने डिवाईस सुविधा उपलब्ध करुन दिली पाहीजे अशी मागणी लाडक्या बहिणीची आहे.




