ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचा विविध मागण्या संदर्भात हिवाळी अधिवेशनात मोर्चा धडकणार

गोंदियाः- महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायत डिजिटल करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सन २०१० पासुन अंमलबजावणी करुन संपुर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत मध्ये २०११ पासुन संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली.ग्रामपंचायत संगणक परिचालकांची नियुक्ती संग्राम प्रकल्प नावाने करण्यात आली.ग्रामपंचायत मधील संपुर्ण  कॅशबुक,दाखले,विविध प्रकारचे कार्यक्रम ऑनलाईन करण्यासाठी संगणक परिचालकांची नियुक्ती कऱण्यात आली.डिजीटल युगात प्रत्येक काम ऑनलाईन करण्यात येतो.महाराष्ट्राला सलग प्रथम क्रमांकावर ठेवण्यात संगणक परिचालकांची महत्वाची भुमिका असली तरी शासन संगणक परिचालकांना वेळेवर मानधन देत नाही.मानधन देते तेही इतके कमी की संगणक परिचालक स्वतःच्या कुंटुबाचा उदर निर्वाह करु शकत नाही.कित्येक संगणक परिचालकांनी मानधन अभावी आत्महत्या केलेले आहेत तरी शासन आमच्या मागण्या पुर्ण करित नाही.                                                                                                                                            महाराष्ट्रातील संपुर्ण आमदार ,खासदार,वरिष्ठ अधिकारी ,व संरपच संघटनेला कित्येकदा निवेदन देवुन आमच्या मागण्या सोडविण्याची विनंती केली आहे.पण आमच्या मागण्या संदर्भात शासन व प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे आम्हाला विविध मागण्या संदर्भात येणा-या नागपुर हिवाळी अधिवेशनात संपुर्ण महाराष्ट्रातील संगणक परिचालक मोर्च्यात सहभागी होणार आहेत.महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष- गुणवंत राठोड, राज्य सचिव- जितेंद्र साखरे,राज्य कोषाध्यक्ष- नितीन तुरकर जिल्ह्यातील जिल्हा उपाध्यक्ष- रोहीत पांडे,जिल्हा सचिव- प्रमोद गौतम व गोंंदिया जिल्ह्यातील संपुर्ण तालुकाध्यक्ष,तालुका सचिव,संपुर्ण पदाधिकारी आज सभेला उपस्थित होते.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचा विविध मागण्या संदर्भात हिवाळी अधिवेशनात मोर्चा धडकणार, ID: 30783

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर