भारत देशात संविधानाची पायमल्ली कायद्याच्या सुव्यवस्थेवर गदा

गोंदियाः- आज भारत देशात बीजेपी सरकार चे कार्यकाळ सुरु आहे.बीजेपी सरकार ही तीन आघाडी मिळुन केंद्राची सत्ता गाजवित आहे.आज भारत देशात सुव्यवस्था व्यवस्थित चालतांनी दिसत नाही.सांविधानिक कायद्याची अंमलबजावणी होतांनी दिसत नाही.भारत सरकार वाक्य गहाळ होवुन मोदी सरकार चे घोष वाक्य मोठ्या जोरात सुरु आहे.सरकार हे एकाच्या नावाने वाजा-गाजा करणे हे भारताच्या लोकशाहीला घात आहे.                  भारतातील जनतेने सांविधानिक अधिकार समजणे आवश्यक आहे.आज भारतात ईव्हीम मशीन च्या माध्यमातुन जे निवडणुक होत आहेत.त्या निवडणुकीवर सामान्य जनता प्रश्न चिन्ह निर्माण करित आहेत.आज बीजेपी सरकार कॉग्रेस सरकार च्या विरोधात भरपुर बोलतांनी दिसते.मग बीजेपी सरकार ईव्हीम मशीन बंद का करित नाही.                                                                                                                        वर्तमान काळात केंद्र सरकार हे सरकारी शाळा वर लक्ष देत नाही.केंद्र सरकार हे खाजगी करणला महत्व देवुन समानता कोठे तरी खत्म करण्याचा पाया रोवण्याचा काम करित आहे.भारतामधील सर्व न्यायव्यवस्था,निवडणुक आयोग ,कार्यपालिका बीजेपी स्वतःच्या घरुन वेतन देते की काय अशी अवस्था आज भारतात दिसत आहे.सामान्य लोकांना देशात न्याय मिळत नाही.युवकांना रोजगार मिळत नाही.ज्या युवकांना नौकरी वर ठेवल्या जाते त्यांना वेळेवर मानधन भेटत नाही.                                                                                                                                           मोदी सरकार च्या नावाने मोठ्या जाहीरातीवर खर्च केल्या जाते.भारतातील शेतकरी लोकांना त्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही.शेतकरी जो उत्पादन करतात त्यांना न्याय सरकार देत नाही.शेतकरी लोकांना २ ते ४ हजार रुपये देवुन चुप करण्याचे काम केंद्र सरकार करित आहे.                       देशात नरेद्र मोदी ला ओबीसी चे नेते म्हणुन घोषित करुन बीजेपी ने सत्ता स्थापन केले.बीजेपी ची सरकार बनल्यानंतर बीजेपी ने ओबीसी वर्गाला न्याय देण्या एवजी ओबीसी चा घात करण्याचा काम करण्यात आला.ओबीसी चे ३१४ युवक आय एस ची परिक्षा पास होवुन त्यांना आता पर्यंत नियुक्ती मिळाली नाही.नरेंद्र मोदी ओबीसी चे असतांनी सुप्रिम कोर्टात जनगना न करण्याचे पत्र देतात.मग नरेंद्र मोदी कोणासाठी काम करतात हाच मोठा प्रश्न निर्माण होतो.                                                                                                                                                            सरकार हे कुणाच्या इशारावर चालते यांची शहनिशा भारतातील लोकांनी केली पाहीजे.भारतातील ओबीसी वर्गानी संविधानिक अधिकार समजुन आज लढण्याची गरज आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: भारत देशात संविधानाची पायमल्ली कायद्याच्या सुव्यवस्थेवर गदा, ID: 30792

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर