आमदार साहेब विधानभवनात बारमाही पाणी उचल करण्यासाठी प्रश्न उचलणार देवरीः- सिरपुरबांध येथील शेतकरी वर्गाला नदी पात्रातील पाणि न उचल करण्याचे नोटीस ग्रामपंचायतला पाटबंधारे विभागाने दिल्यामुळे शेतकरी हे विचाराधिन झाले होते.आमच्या गावात एवढा मोठा धऱण असुन त्या धरणाचे पाणि शेतकरी वर्गाला मिळत नसेल तर शेतकरी लोकांनी काय कराव असे प्रश्न शेतकरी बांधवाना पडत आहेत.मागील दोन वर्षामध्ये पाटबंधारे विभागाने व्यवस्थित पाणि न सोडल्यामुळे कित्येक शेतकरी लोकांचे पिक मेले व मोठे नुकशान झाले असे पुन्हा होवु नये यासाठी आमदार साहेब, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व शेतकरी यांची सभा पार पडली. पाटबंधारे विभाग सिरपुरबांध येथील शेतकरी वर्गासाठी पाणि सोडायला तयार नाही असे त्यांचे म्हणणे होते.कित्येक लोकांचे नुतनीकरण झाले नाही काही लोक नविन आहेत त्यांनी संबधित पाटबंधारे विभागात नोंदणी करण्यासाठी सांगितले आहे.सर्व शेतकरी लोकांनी जे कागदपत्रे लागतात ते कागदपत्रे घेवुन नोंदणी करुन घ्यावी. संजय पुराम आमदार यांनी शेतकरी लोकांना मार्गदर्शन करतांनी सर्व शेतकरी वर्गाला पाणि भेटल व मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना हा विषय सांगुन येणा-या हिवाळी अधिवेशनात तुमचा प्रश्न मांडतो व उन्हाळी हंगामात पाणि मिळेल यांची ग्वाही दिली आहे.




