टाईटी अनिवार्यता,जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष देवरीः- टीईटी अनिवार्यता,जुन्या पेन्शनचा प्रश्न,शिक्षण सेवक योजनेतील ताणतणाव,तसेच शिक्षण विभागाकडुन वारंवार होत असलेल्या दुर्लक्षाला वैतागलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांनी शुक्रवार दि.०५ डिंसेबर २०२५ रोजी शाळा बंद मोर्चा आणि संप पुकारला होता. शासनाने शिक्षकांसमोर विविध समस्या निर्माण करुन गावातील शासकीय शाळा बंद करण्याचे नियोजन केले की काय या बदल संभ्रम निर्माण होत आहे.शिक्षकांच्या कोणत्या समस्या बदल आज शाळा बंद आंदोलन होते. १) टाईटी निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी. २) टाईटी निकालाचा चुकीचा अर्थ काढुन विविध कार्यालयाकडुन सुरु असलेली कार्यवाही तात्काळ थांबवावी. ३) मा.ना.से.नियम १९८४-१९८५ नुसार जुनी पेन्शन योजना लागु करावी. ४) शिक्षणसेवक योजना रद्द करुन नियमित वेतनश्रेणी लागु करावी ५) शिक्षकांनाही १०,२०,३०,वर्षानंतरची सुधारित तीन वेतन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागु करावी. ६) १५ मार्च २०२४ ची संचमान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा. ७) वस्ती शाळेतील शिक्षकांची सेवा मुळनियुक्ती तारखेपासुन सर्व लाभासाठी ग्राह्य धरावी. ८) आश्रम शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करणे. ९) एकलशिक्षकांना ३० कि.मी.च्या आत मुख्यालयाची परवानगी देण्यात यावी. १०) कमी पटाच्या शाळा बंद न करता शिक्षणक्रम सुरु ठेवावा. ११) शिक्षकांचे इतर प्रश्न तातडीने सोडवावे. अशा विविध मागण्या घेवुन उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढुन निवदेन देण्यात आले.




