देवरीः- सिरपुरबांध ते शिलापुर नदीजवळील शेतकरी हे उन्हाळी पिक घेण्यासाठी विचार करित आहे.दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी उन्हाळी हंगाम लावणे विचाराधिन आहे.पाटबंधारे विभागातील अधिकारी वारंवार शेतकरी विरोधात पत्रव्यवहार करुन शेतकरी लोकांना भितीचे वातावरण करण्याचे काम पाटबंधारे विभाग करित आहे.शेतकरी लोकांसाठीच भारतात कठोर कायदे तयार झाले की काय?शेतकरी लोकांना इंग्रजापेक्षा बीजेपी सरकार च्या काळात जास्त गुलाम झाल्यासारखे वाटत आहे. आमगांव विधानसभा क्षेत्रातील आमदार,विधानपरिषद आमदार,माजी आमदार यांच्या संपर्कात शेतकरी राहुन वारंवार त्यांच्या संपर्कात आहेत.पाटबंधारे विभागातील अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन शेतकरी लोकांना पाण्याची सोय करु शकत नाही तर लोकनेता कुणासाठी काम करतात हे प्रश्न जनतेपुढे आहेत.लोकनेता हे व्यापारी वर्गाला जास्त मदत करतात अशी समजुत शेतकरी वर्गाची आहे. शेतकरी लोकांना पाणि देणार नाही तर शेतकरी लोक मोठ्या प्रमाणात आंदोलनाची भुमिका घेणार आहेत.




