देवरीः- देवरी तालुक्यातील सिरपुरबांध जलाशयातील पाणि शेतीसाठी शेतक-यांना पाणि मिळत नसल्यामुळे शेतकरी लोकांनी अनेक नेते,अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन शेतीला पाणि देण्याची परवानगी मागण्याची विनंती केली आहे.पण कोणत्याच नेत्यांनी शेतकरी लोकांना परवानगी देण्यासाठी मदत केली नाही.शेतकरी लोकांच्या खालील मागण्या २३/१२/२०२५ पर्यंत पुर्ण न झाल्यास १) सिरपुरबांध पाटबंधारे विभागाकडुन शेती करण्याकरिता उन्हाळी हंगामाची परवानगी मिळणे. २) सुफलाम कंपनीला होणारा अवैध पाणि पुरवठा बंद करणे. ३) सिरपुरबांध ते शिलापुर पर्यंतच्या शेतक-यांनी पाणि उचल करण्याची परवानगी मिळणे. ४) सुफलाम कंपनीला होणा-या अवैध पाणिपुरवठा होत असुन सुद्धा विभागाने कोणतिच कार्यवाही केली नसल्यामुळे संबधित अधिका-यांवर कार्यवाही करण्यात यावी. चार मागण्या मान्य न झाल्यास दिनांक २४/१२/२०२५ ला सिरपुरबांध येथे चक्का जाम आंदोलन शेतकरी वर्गानी करण्याचे निवदेन उपविभागीय अधिकारी देवरी,तहसिलदार देवरी,पोलिस स्टेशन देवरी,यांना दिले.शेतकरी लोकांनी आपल्या घरचे पुर्ण सदस्य घेवुन आंदोलनात सहभागी होण्यासाठी आव्हान केले आहे.




