पोलिस उपअधिक्षक यांनी तीन दिवसात आरोपिला अटक करण्याचे महिलां प्रतिनिधीना दिले शब्द देवरीः- देवरी तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेले काशिनाथ शहारे यांच्यावर गुन्हा नोंद होवुन आता पर्यंत त्यांना अटक का होत नाही या संदर्भात देवरी येथिल महिलांनी पुढाकार घेत त्यांनी देवरी पोलिस स्टेशन गाठुन देवरी येथिल पोलिस उपअधिक्षक विवेक पाटील यांच्या शी चर्चा करुन एवढा मोठा गुन्हा असुन आपण आरोपी ला अटक का करित नाही.एखाद्या सामान्य मानसावर आरोप झाले तर आपण तात्काळ गुन्हा नोंद करुन त्यांच्या वर कार्यवाही करता अशा विविध चर्चा त्यांच्या सोबत झाल्या त्यावर पोलिस विभागा मार्फत सखोल चौकशी सुरु आहे.जे आरोपी आहेत त्यांचे मोबाईल बंद आहे.त्यांचे ट्रक लोकेशन सुरु आहे. देवरी महिला प्रतिनिधी यांनी पोलिस अधिक्षक यांना चेतावनी दिलेली आहे की आरोपीला आपण तीन दिवसात अटक केली नाही तर संपुर्ण तालुक्यातील महिला व सामाजिक संघटनाचा भव्य मोर्चा पोलिस विभागावर काढण्यात येईल असे त्यांनी निवेदन देतांनी सांगितले. संपुर्ण समाजाला आव्हान करण्यात आले की आज एका गरीब कुंटुबामधील मुलीचा दुरउपयोग वस्तीगृहाच्या नावाने होत असेल तर भविष्यात अशा नराधामाकडुन काही होवु शकतो म्हणुन आपण कायद्याच्या चौकटीत राहुन आरोपीला अटक झालीच पाहीजे यासाठी सर्वांनी आवाज उठवला पाहीजे. निवेदन देतांनी सौ.जिजा सिलारे,सौ.शिल्पा बान्ते,सौ.नुतन सयाम,कु.सुषमा अमृत पंधरे,अॅ.विमल एस.बारसे,सौ.मंदा ठवरे,सौ.हेमलता कुंभरे,सौ.शिला मारगाये,सौ.अनवंता आचले उपस्थित होत्या.




