Published:

​आमदार संजय पुराम यांची संवेदनशीलता

गंभीर आजारी सुरेश माहुरे यांना दिली तातडीची आर्थिक मदत!
​साखरीटोला-:
गोरगरीब आणि गरजूंच्या अडीअडचणीला धावून जाणे हाच खरा लोकप्रतिनिधीचा धर्म असतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. देवरी तालुक्यातील फुटाना येथील रहिवासी सुरेश हरिश्चंद्र माहुरे हे मागील काही दिवसांपासून अत्यंत गंभीर आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्यामुळे, औषधोपचार तर दूरच, साधे औषध विकत घेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशा अत्यंत कठीण प्रसंगात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार संजय पुराम यांनी माहुरे कुटुंबाला मोठा आर्थिक व मानसिक आधार दिला आहे.
तातडीची मदत अन् मोफत उपचाराचे आश्वासन
10 जून रोजी ​सुरेश माहुरे यांचे कुटूंबीयांनी पुराडा येथे जाऊन आमदार संजय पुराम यांची भेट घेतली. सुरेशच्या आजारपणाची आणि हलाकीच्या परिस्थिती सांगितले असता आमदारांनी अत्यंत संवेदनशीलतेने त्यांची विचारपूस केली आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांच्या औषधोपचारासाठी तातडीने 10 हजार रुपयांची रोख मदत केली. व ​केवळ एवढ्यावरच न थांबता, सुरेश माहुरे यांच्यावर पुढील मोठे उपचार शासनाच्या विविध आरोग्य योजनांच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करून दिले जातील, असे आश्वासनही आमदार पुराम यांनी दिले. यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य ती सर्व मदत करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. ​ऐन संकटसमयी आमदार संजय पुराम यांनी देवदूतासारखी मदत केल्यामुळे माहुरे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. “आमच्याकडे उपचारासाठी एक रुपयाही नव्हता, पण आमदार साहेबांनी आम्हाला मदत करून नवीन आयुष्य दिले आहे,” अशा भावना व्यक्त करत सुरेश माहुरे यांच्या कुटुंबीयांनी आमदार संजय पुराम यांचे मनापासून आभार मानले आहेत. त्यांच्या या संवेदनशीलतेचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: ​आमदार संजय पुराम यांची संवेदनशीलता, ID: 30977

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर