देवरीः- (02) देवरी तालुक्यात ओबिसी संघटना आपले अधिकार मिळण्यासाठी शासनाला विविध प्रकारे निवेदन देवुन मागणी करित आहे.आज देवरी कुनबी समाज भवनात संपुर्ण ओबिसी समाजातील सर्व जातीचे लोग आजच्या सभेत आले होते.भारतामध्ये ओबिसी समाजाची 52 टक्के लोकसंख्या ही इग्रजांच्या काळात 1931 मध्ये माहीती झाली.त्यानंतर भारताला स्वातंत्र्य 1947 ला मिळाल.त्यानंतर भारताची न्याय व्यवस्था चालविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात कायदे होणे आवश्यक होते.त्यासाठी भारतामध्ये संविधान तयार करण्यात आले. संविधानात ओबिसी समाजाचा सांविधानिक आयोग तयार करण्यासाठी 340 कलम तयार करण्यात आली.1950 ला संविधान लागु झाल्यापासुन भारतात स्वतंत्र ओबिसी म्हणुन जातीय जनगणना न झाल्यामुळे ओबिसी समाजाच्या संख्येनुसार ओबिसी लोकांना त्यांना सांविधानिक अधिकार मिळाले नाही.ओबीसी समाज अधिकार मागण्यासाठी सतत संर्घष करित राहीला त्यानंतर 40 वर्षाच्या नंतर ओबिसी समाजासाठी बि.पी.मंडल यांच्या नेतृत्वात व्हि.पी.सिंग पंतप्रधान यांनी ओबिसी समाजाला शिक्षण,नौकरी मध्ये 27 टक्के आरक्षण दिले. आज ओबिसी समाजाची जनगणना स्वतंत्र न करिता जातीने करण्याचे शासनाने ठरविले आहे.ओबिसी समाजाची जनगणना स्वतंत्र ओबिसी कॉलम मध्ये झाली पाहीजे या बदल सविस्तर माहीती देण्यात आली. 2) ओबिसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थामधुन आरक्षण समाप्त केला आहे तो आरक्षण पुर्ववत करावे. 3) ओबीसी समाजाला प्रत्येक सांविधानिक पदावर त्यांच्या संख्येनुसार प्रतिनिधित्व देण्यात यावे. 4) नॉनक्रिमीलेयर अट शिथिल करण्याबदल चर्चा करण्यात आली. ओबिसी समाजाच्या वरील मागण्या पुर्ण जर नाही झाल्या तर भविष्यात सरकारच्या विरोधात भव्य आंदोलन करण्याचे नियोजन संघटनेच्या वतीने करण्यात येईल असे आजच्या सभेत ठरविण्यात आले. आजच्या सभेचे अध्यक्ष राम गायधने होते.मा.संदिप तिडके सर, अध्यक्ष जिल्हा कर्मचारी संघटना गोंदिया,मा. अॅड.गंगबोहीर,उपाध्यक्ष,ओबिसी संघटना देवरी,मा.डाॅ.चौरागडे साहेब,मार्गदर्शक मा.भैय्यालालजी चांदेवार,मार्गदर्शक, मा.डाॅ.धुमनखेडे साहेब,मार्गदर्शक, मा.शेखर कनोजिया, जिल्हा प्रतिनिधी, मा.राजुभाऊ चांदेवार, जिल्हा प्रतिनिधी, मा.छोटेलालजी बिसेन, उपाध्यक्ष, मा.रतिरामजी दरवडे, उपाध्यक्ष, मा.सुशीलजी शेंद्रे,सचिव,मा.नेवरगडेजी संघटन सचिव,मा.बडवाईक सर,कोषाध्यक्ष तसेच सर्व मा.कार्यकारिणी सदस्य व सर्व ओबीसी समाज बांधव, देवरी तालुका. उपस्थित होते.




