शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

12 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू
गोंदिया, दि.12 : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील उत्कृष्ट खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०२४-२५ आणि सन २०२५-२६ या वर्षांच्या पुरस्कारांसाठी पात्र खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत सहभागी झालेल्या खेळाडू व व्यक्तींनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडापटूंसाठी जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांत सहभागी झालेल्या खेळाडू व व्यक्तींसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासनाच्या २९ डिसेंबर २०२३ आणि २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयांनुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची सुधारित नियमावली, २०२३ निश्चित करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या दोन वर्षांतील पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया १२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली आहे.
इच्छुक व पात्र अर्जदारांनी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटे ५९ सेकंदांपर्यंत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. निर्धारित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून पात्र उमेदवारांनी या पुरस्कारासाठी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन, ID: 31103

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर