दुष्काळी परिस्थितीत पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडून पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी

पांजरा, विहीरगाव व डोंगरगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधून जाणून घेतल्या अडचणी
गोंदिया, दि. 21 : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज तिरोडा तालुक्यातील पांजरा व विहीरगाव तसेच गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव परिसरातील शेतशिवारांना भेट देऊन पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसातील खंडामुळे पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम, पाण्याची उपलब्धता, संभाव्य पीक नुकसान आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींची माहिती त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून जाणून घेतली.
दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांवर झालेला परिणाम समजून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची सद्यस्थिती पाहिली. यावेळी पर्जन्यमान, पावसातील खंड, सिंचनासाठी उपलब्ध पाणी आणि संभाव्य उत्पादनावर होणारे परिणाम याबाबत संबंधित शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली.
ट्रिगर-1 मध्ये जिल्ह्यातील सर्वप्रथम तिरोडा तालुक्याचे नाव जाहीर झाले होते. ट्रिगर-2 मध्ये उर्वरित गोंदिया जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची नावे आलेली आहेत. तिरोडा तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती ही इतर तालुक्याच्या तुलनेत अधिक तीव्र असल्याने या दौऱ्याचे आयोजन महत्त्वाचे आहे.
नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद
तिरोडा तालुक्यातील पांजरा येथे शेतकरी बळीराम चामट यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी पाहणी केली. त्यानंतर विहीरगाव येथील शेतकरी अशोक रहांगडाले यांच्या शेतातील पिकांच्या स्थितीची माहिती घेतली. गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव येथे शेतकरी घनश्याम पटले यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पावसाअभावी शेतीवर झालेल्या परिणामांचा आढावा घेतला.
यावेळी शेतकऱ्यांनी पिकांच्या वाढीवर झालेला विपरीत परिणाम, वाढता उत्पादन खर्च, सिंचनासाठी पाण्याची कमतरता आणि प्रतिकूल हवामानामुळे निर्माण झालेल्या अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप हंगामातील उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.
पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा
दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाईच्या स्वरूपात मदत मिळावी, अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून नियमानुसार नुकसानभरपाई व आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, तसेच सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन दुष्काळी परिस्थितीची वस्तुस्थिती समजून घेण्याच्या दृष्टीने या पाहणी दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित
तिरोडा तालुक्यातील पांजरा व विहीरगाव पाहणीदरम्यान आमदार विजय रहांगडाले, तहसीलदार नारायण ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे, गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे आणि तालुका कृषी अधिकारी आकाश गेडाम उपस्थित होते.
गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव परिसरातील पाहणीदरम्यान आमदार विनोद अग्रवाल व विजय रहांगडाले, तहसीलदार समशेर पठाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे, डोंगरगावच्या सरपंच कोमेश्वरी टेंभरे आणि तालुका कृषी अधिकारी नेहा आढाव उपस्थित होते.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: दुष्काळी परिस्थितीत पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडून पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी, ID: 31194

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर