दुष्काळाने धान उत्पादक शेतकरी अडचणीत; पंचनामे पूर्ण, पाच हजार रुपयांची अग्रिम मदत वाटप सुरू : जिल्हाधिकारी मंदार पत्की

जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांची माहिती संकलित; खचून न जाता पुढील हंगामाच्या तयारीला लागण्याचे                                                                             जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन                                                                        गोंदिया, दि. 4 : यंदाच्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. काही भागांत कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे, तर काही भागांत पाण्याच्या अभावामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या संकटातून दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिली.
जिल्हाधिकारी पत्की म्हणाले की, यंदा प्रतिकूल हवामान आणि दुष्काळी परिस्थितीचा धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पिकांचे नुकसान लक्षात घेऊन शासनाने पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करून एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे. शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये; प्रशासन मदतीसाठी तत्पर
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, नैसर्गिक संकटामुळे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. उपलब्ध संसाधने आणि हाताशी असलेल्या उत्पन्नाचा योग्य वापर करून पुढील पीक घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवावेत. शेतीसंदर्भात किंवा अन्य कोणत्याही शासकीय मदतीसाठी अडचण असल्यास जिल्हा प्रशासन किंवा संबंधित तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांना आवश्यक मदत व सहकार्य करण्यासाठी प्रशासन तत्पर आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: दुष्काळाने धान उत्पादक शेतकरी अडचणीत; पंचनामे पूर्ण, पाच हजार रुपयांची अग्रिम मदत वाटप सुरू : जिल्हाधिकारी मंदार पत्की, ID: 31271

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर