शिक्षक समितीच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद; जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान!

      एकस्तर पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका; शिक्षक समितीच्या वतीने सत्कार करून मानले

गोंदिया : शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष आणि पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, एकस्तर पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल गोंदिया जिल्हा परिषदेचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री. सुरेश हर्षे यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी शिक्षक समितीने सातत्याने पाठपुरावा केला आहे. विशेषतः एस-१४ वेतनश्रेणीच्या प्रश्नासाठी समितीने उभारलेल्या संघर्षात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांना सकारात्मक साथ देत एकस्तर पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी केलेले सहकार्य कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.याशिवाय शिक्षकांच्या वेतननिश्चिती संदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सकारात्मक आश्वासनही मिळाले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघर्षासोबतच सकारात्मक संवाद आणि प्रशासकीय समन्वय किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप तिडके,विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार, एच. एस. बिसेन, उमेश रहांगडाले, राज कडव, सुभाषचंद्र बोपचे, बस्वराज केसाळे, जयेश लिल्हारे, जयंत रंगारी, संतोष बारसगडे, गणेश कांगणे, मनोज रहांगडाले, तालेश्वर नेवारे, मच्छिरके, मोरेश्वर लोणारे, लिल्हारे, बसोने, मनोज पंधरे, दुर्योधन राऊत, लोकेश मेश्राम, असाटी यांच्यासह शिक्षक समितीचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केल्याबद्दल जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांचे शिक्षक समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
“””””””””””””””””””””””””””””””””””
“शिक्षकांचे न्याय्य हक्क, प्रलंबित प्रश्न आणि सेवाविषयक समस्या मार्गी लागेपर्यंत शिक्षक समितीचा संघर्ष, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सकारात्मक संवाद यापुढेही सुरूच राहील”

संदीप तिडके
जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया

आभार

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: शिक्षक समितीच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद; जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान!, ID: 31289

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर