सालेकसाः- (बाजीराव तरोणे) सालेकसा तालुक्यातील भजेपार ते बोरकन्हार या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विद्युत पुरवठा म्हणून विद्युत ट्रांसफार्मर उपलब्ध करून दिले आहे. मात्र येन शेतीच्या वेळी हा ट्रान्सफरम दीड महिन्यापासून बंद पडलेला आहे यासंदर्भात येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी साखरीटोला यांच्याकडे दोन तीनदा जाऊन यांना माहिती कळविले असता दोन-चार दिवसात होऊन जाईल अशी हमी दिली मात्र या बाबीला दीड महिना होऊनही हा विद्युत ट्रांसफार्मर दुरुस्ती करण्यात आला नाही.त्यामुळे येथील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी लागणारी विद्युत उपलब्ध नसल्याने मोठा संकट निर्माण झाला आहे सदर विषयाला घेऊन जर आठवड्याभरात विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला नाही तर शेतकऱ्यांच्या वतीने मोठे पाऊल उचलले जाईल असे शेतकऱ्यांचे बोलणे आहे.भजेपार ते बोरकन्हार येथील विद्युत ट्रांसफार्मर दीड महिन्यापासून बंद पडून आहे. यासंदर्भात माहितीही उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.शेतीच्या कामाला सुरुवात झाली असून त्वरित येथील विद्युत पुरवठा सुरू करण्यात यावा.
तुलसीदास ब्राम्हणकर
शेतकरी भजेपार
