आमगांवः- दि.०४) आमगांव येथे जाहीर व्याख्यान व नवनिर्वाचित खासदार यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजि करण्यात आला होता.प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थित अतुल अड्याळ पवार- संचालक पनन महामंडळ मुंबई,येशवंत परशुरामकर,महासचिव राष्ट्रवादी काग्रेस,सौरभ रोखडे-जिल्हाध्यक्ष,मिथुन मेश्राम-कार्यध्यक्ष,तिर्थ येटरे-जिल्हा महासचिव, बालु वंजारी- जिल्हा उपाध्यक्ष ,मंजु डोंगरवार-जिल्हा महीला अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष- घनश्याम रांहगडाले व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रामुख्याने व्याखानात प्रा.नितेश कराळे यांनी युवकांना मार्गदर्शन करतांनी वर्तमान भारतातील राजकारणामुळे प्रत्येक क्षेत्रातील युवकांना भरपुर त्रास सहन करावा लागत आहे.आज शैक्षणिक क्षेत्राला कमजोर करुन लोकांना अशिक्षित करण्याकडे सरकारचा काम सुरु आहे.आज प्रशासनात व राजकारणात ब्राम्हणाचे साम्राज्य स्थापित आहे.देशातील थोर पुरुषांनी बहुजन समाजातील लोकांना समानता प्रास्थापित करण्यासाठी संर्घष केला पण आमचे लोक अभ्यास करित नसल्यामुळे आमच्या लोकांना समजले नाही.मी ओबीसी समाजाला सांविधानिक अधिकार व मंडल आयोग अभ्यास करण्याची गरज आहे.ओबीसी समाजाने आपल्या घरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहु महाराज यांची फोटो ठेवुन त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा तिरस्कार न करता ओबीसी समाजाने त्यांना वाचले पाहीजे. कार्यक्रमाचे आयोजक भुमेश शेंडे – तालुका अध्यक्ष,राजकुमार लाडसे तालुका उपाध्यक्ष,अंकुश शिवणकर-तालुका युवाध्यक्ष,अजय उके-तालुका महासचिव,इंद्रपाल कटरे- शहर अध्यक्ष,योगेश्वरी पटले- महीला अध्यक्ष,तिप्ती बघले- महीला सचिव कार्यक्रमाला भरपुर लोकांचा सहभाग होता. त्यात युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन- घनश्याम राहांगडाले यांनी केले व आभार बालु वंजारी यांनी केले.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: बहुजनाच्या युवकांनी धर्माच्या नांदी न लागता अभ्यास करुन प्रशासनात व राजकारणात सहभागी व्हावे.नितेश कराळे (प्राध्यापक), ID: 30154
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: बहुजनाच्या युवकांनी धर्माच्या नांदी न लागता अभ्यास करुन प्रशासनात व राजकारणात सहभागी व्हावे.नितेश कराळे (प्राध्यापक), ID: 30154
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]