देवरीः- देवरी तालुक्यात उन्हाळी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.देवरी तालुक्यात सिरपुरबांध धरण असुन धरणाच्या खालील भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पिक घेतात.ओवारा धरण व वैयक्तिक बोरवेल ने भरपुर शेतकरी धान पिकाचे उत्पन घेतात.देवरी तालुक्यात आदीवासी सोसायटी महामंडळ धान खरेदी करण्याचे काम करित आहे. शेतकरी यांना त्याच्या धान केंद्रावर आणल्यानंतर त्यांना पोत्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे.त्यांना पोते न मिळाल्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे.शेतकरी बांधवाना शासन कोणत्याच प्रकारचा मोबदला पोत्यावर देत नाही.शेतकरी यांचे पोते बाजारात 25 ते 35 रुपये भाव आहे.शेतकरी यांना आपल्या धानाच्या भावातच पोते शुध्दा द्यावे लागतात.हे शासनाचे धोरण चुकीचे असुन शासनाने धान विक्रीला येण्या आधी पोत्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. शेतकरी यांनी दिलेल्या पोत्याचे आज पर्यंत शासनाने कधीच पैसे दिलेले नाहीत.तरी शासनाने धान खरेदी केंद्रावर पोत्याची व्यवस्था करावी अशी शेतक-यांची मागणी आहे.




